Raver Lok Sabha : रक्षा खडसे यांना… एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. अद्याप जागावाटपाचा पेच सुटलेला नाही. त्यातच अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे ?
रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी भाजपमध्ये असलेल्या सूनबाई रक्षा खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीबद्दल ऑफर दिली होती असं म्हटलंय. यानंतर रक्षा खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का यावरही खुलासा केला. एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या सून रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती. पण राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल खासदार रक्षा खडसे यांनी नकार दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.