Raver Lok Sabha Election Result : रावेरमधून रक्षा खडसे विजयी, श्रीराम पाटलांचा दारुण पराभव

Raver Lok Sabha Election Result : रावेर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या विजयी झाल्या आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान मागील २० वर्षांपासून रावेरमध्ये भाजपचा खासदार आहे, त्यामुळे यंदा येथे काही चमत्कार होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या विजयी झाल्या आहे.

१ लाख ४८ हजार ४४३ मतांनी विजयी
रावेर लोकसभेत महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी १ लाख ४८ हजार ४४३ मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पराभवला रामोरे जावे लागले आहे.