Raver Lok Sabha Election Result : मतदान यंत्र एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी ९९ टक्के कशी आहे, अशी शंका उपस्थित करत रावेर लोकसभा मतमोजणीवर मविआचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेतला. यामुळे काही वेळ मतमोजणी थांबवण्यात आली. दरम्यान, वृत्त लिहेपर्यंत मतमोजणी सुरु झाली असून, सहाव्या फेरी अखेर रक्षा खडसे यांना जवळपास 75 हजाराने लीड मिळालेला आहे.
मतदान यंत्र एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी ९९ टक्के कशी आहे, अशी शंका उपस्थित करीत रावेर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून थांबवली. रावेर मतदार संघात तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून भाजपच्या रक्षा खडसे यांचे मत्ताधिक्य वाढत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मतदान यंत्रावर शंका उपस्थित केली.
मतदान यंत्रे एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी ९९ टक्के कशी आहे अशी शंका त्यांनी उपस्थित केली. ज्या मतदान यंत्राचे बॅटरी ९९ टक्के आहे, त्या मतदान यंत्रात भाजपला आघाडी मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
दरम्यान, वृत्त लिहेपर्यंत मतमोजणी सुरु झाली असून, सहाव्या फेरी अखेर रक्षा खडसे यांना जवळपास 75 हजाराने लीड मिळालेला आहे.
दरम्यान, सहाव्या फेरी अखेर रक्षा खडसे यांना जवळपास 75 हजाराने लीड मिळालेला आहे. अजून 23 फेऱ्यापर्यंत जायचं आहे. कदाचित हा लीड अडीच लाखापर्यंत जाऊ शकेल आणि हे चित्र पाहत असताना विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे. विरोधकांचा संतुलन बिघडलेलं त्या ठिकाणी दिसत आहे. कालच काँग्रेसचे नेत्यांनी जाहीर केलं होतं की तुम्ही बूथ सोडू नका त्यानुसार यांनी गोंधळ घालायचं केलेलं ठरवत दिसतंय असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.