Raver Loksabha Election Result : रावेर लोकसभेत भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत झाली. रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी साधारण ६४.२८ टक्के मतदान झाले. या निवडणूक निकालाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली असून, ४ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, रावेर लोकसभेत रक्षा खडसे की श्रीराम पाटील अशी चर्चा सुरु झाली आहे.
रावेरमध्ये कुणाचं पारडं जड होतं ?
रावेरमध्ये 2009 मध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी निवडणूक जिंकली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलून रक्षा खडसे यांना तिकीट दिले. 2014 मध्ये देशभरात मोदींची लाट असताना भाजपने ही जागा सहज जिंकत रक्षा खडसे खासदार झाल्या. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनीष जैन यांचा 3,18,060 मतांनी पराभव करत रक्षा खडसे विजयी झाल्या. यानंतर 2019 मध्ये भाजपने पुन्हा एकदा खडसे यांना उमेदवारी दिली. खडसे पुन्हा एकदा विजयी होऊन खासदार झाल्या. काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास वासुदेव पाटील दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 3,19,504 मते मिळाली होती.
२०१९ ची परिस्थिती
1) रक्षा खडसे, भाजप – 655386
2) डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस – 319504
3) डॉ. योगेंद्र कोलते, बहुजन समाज पार्टी – 5705
4) अजित तडवी, राष्ट्रीय आम जन सेवा पार्टी – 1425
5) रोहिदास अडकमोल, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया – 1679
6) नितीन कांडेलकर, वंचित बहुजन आघाडी – 88365
7) मधुकर पाटील, हिंदुस्थान जनता पार्टी – 1607
8) रोशन अली, इंडियन युनियन मुस्लिम लीग – 1103
9) गौरव सुरवाडे, अपक्ष – 985
10) विजय तंवर, अपक्ष – 1141
11) नजमीन शेख, अपक्ष – 2581
12) डी.डी. वाणी, अपक्ष – 4274
राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान
अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के, नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के, सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के.