रावेर बाजार समिती : सभापती, उपसभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

---Advertisement---

 

रावेर: रावेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन रमेश पाटील व उपसभापती योगेश ब्रिजलाल पाटील यांच्यावर बाजार समितीच्या १२ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या घटनेने रावेर तालुक्यात राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.


रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्वपक्षीय सत्ता होती. सर्व मिळून बाजार समितीवर सत्ता असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे. बाजार समितीच्या १२ संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सभापती सचिन रमेश पाटील व उपसभापती योगेश बिजलाल पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

या प्रस्तावात म्हटले आहे की, सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील हे बाजार समितीच्या संचालकांशी वागणे हे जबाबदाऱ्यांचे नसून अकार्यक्षम आहे. सचिन पाटील व योगेश पाटील यांच्या अकार्यक्षमता व बेजबाबदारपणामुळे बाजार समितेचे नुकसान होत आहे.

---Advertisement---

 


बाजार समितीच्या कामाचे आर्थिक नियोजन न करणे व संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी कार्यपध्दतीने काम करणे, यामुळे आम्ही सदस्यांनी सचिन पाटील व योगेश पाटील यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे योजिले आहे. त्यानुार त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन त्यांना तत्काळ सभापती व उपसभापती पदावरुन पदमुक्त करावे, अशी विनंती अविश्वास प्रस्ताव केली असून हे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे ११ सप्टेंबरला दाखल केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---