रावेर । रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ती म्हणजे महावितरणच्या अत्तीउच्च टॉवरवर चढून २५ वर्षीय परप्रांतीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ब्रिजेश कुमार काटकु बायगा (वय २५ रा. भरतपुर, जिल्हा कोरिया, छतीसगढ) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेबाबत असे की, ब्रिजेशकुमार हा तालुक्यातील विवरे खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या पावरग्रिटच्या अत्तीउच्च विद्युत क्षमतेच्या मोठ्या टावरवर सुमारे ५० फुटवरती चढला. कापडच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. त्याची पँटमधुन पॅन कार्ड आढळून आल्याने त्यावरून पोलीस प्रशासनाने त्याचे नातेवाईकांशी संपर्क केला. त्यावरून त्याची ओळख पटली.
ब्रिजेश याला पावर ग्रिटच्या अकोला पथकाच्या सहकार्यने खाली उतरविण्यात आले असुन रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. निंभोरा पोलीस स्टेशनला पोलीस पाटील रितेश चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील हे करीत आहे. दरम्यान, मयत ब्रिजेश कुमार काटकु बायगा रावेर तालुक्यात नेमका कशासाठी आला होता हे समजू शकले नाही.