---Advertisement---

Raymond Share: रेमंडचा शेअर एकाच दिवसात ६५ टक्के घसरला, गुंतवणूकदार चिंतेत, कारण काय?

---Advertisement---

Raymond Share: आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान रेमंड लिमिटेदच शेअर्स ६५ टक्क्यांनी घसरला आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. कालच्या ट्रेडिंग सत्रात रेमंडचा शेअर १५६१.३० रुपयांवर व्यवहार करत होता, जो आज ५५६ रुपयांवर व्यवहार करतांना दिसत आहे. हि घसरण ६४.३६% पर्यंत आहे.

परंतु गुंतवणूकदारांनी या घसरणीबद्दल घाबरण्याची गरज नाही कारण शेअरच्या किमतीत इतकी मोठी घसरण होण्याचे कारण कोणतीही नकारात्मक बातमी नाही तर त्यांच्या रिअल इस्टेट शाखा, रेमंड रिअल्टीच्या डिमर्जरनंतर तांत्रिक समायोजन आहे.

रेमंड लिमिटेडमधून रेमंड रिअल्टीचे डिमर्जर करण्याची आजची रेकॉर्ड डेट आहे. त्यानुसार, रेमंड रिअल्टीचे शेअर्स मिळविण्यासाठी कोणते शेअरहोल्डर्स पात्र आहेत हे निश्चित केले जाईल. रेकॉर्ड डेटनुसार, रेमंड लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना रेमंड लिमिटेडच्या प्रत्येक शेअरच्या बदल्यात रेमंड रिअल्टीचा एक शेअर मिळेल.

केलेल्या गुंतवणुकीत कोणतेही नुकसान नाही

रेमंड लिमिटेडच्या शेअरची किंमत घसरली आहे, परंतु डिमर्जरनंतर, शेअरहोल्डर्सना आता दोन वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी लागेल. एक रेमंड लिमिटेडमध्ये आणि दुसरे रेमंड रिअॅल्टीमध्ये, जे लवकरच सूचीबद्ध केले जाईल. गुंतवणूकदारांनी कितीही भांडवल गुंतवले असले तरी, या घसरणीचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment