RBI चा आणखी एक झटका, पेटीएमनंतर व्हिसा-मास्टरकार्डवर कडक कारवाई

पेटीएमवरील कारवाईनंतर रिझर्व्ह बँकेने कार्ड पेमेंट गेटवे व्हिसा, मास्टर कार्ड, एमेक्स आणि डायनर्सला मोठा झटका दिला आहे.

RBI ने अलीकडेच कंपन्यांना व्यावसायिक कार्ड वापरून विक्रेत्यांना पेमेंट करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने ही बंदी का घातली याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिझर्व्ह बँकेला असे आढळले आहे की या कंपन्यांच्या कार्डद्वारे अशा व्यापाऱ्यांना पेमेंट केले जात होते ज्यांच्याकडे केवायसी नाही, परंतु तरीही कार्डद्वारे पेमेंट घेतात.