मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशातील कोट्यवधी कर्जदारांना दिलासा दिला आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने या वर्षीही धोरणात्मक व्याजदर रेपो दरात कोणताही बदल केला नाही. RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
एप्रिल 2023 पासून केंद्रीय बँकेने रेपो दर कायम ठेवला आहे. त्यात वाढ केलेली नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटची वाढ झाली होती. गेल्या वर्षभरात रेपो दर न वाढल्याने कर्जावरील हप्ता जैसे थे आहे. खरं तर ग्राहक रेपो दरात कपातीचा अपेक्षा करत आहेत.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की जागतिक आर्थिक परिस्थितीवरून संमिश्र संकेत आहेत. अस्थिर जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली आहे. ते म्हणाले की, महागाईही कमी होताना दिसत आहे. यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे शक्तिकांता दास यांनी सांगितले. ज्यामध्ये समितीने रेपो दर 6.50 टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला.
शेअर बाजारात तेजीचे संकेत
रेपो दर जैसे थे ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. बाजार सध्या तेजीत आहे. गेल्या दोन दिवसात बाजाराने मोठी झेप घेतली आहे. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या अजून सूसाट वेगाने धावण्याची गॅरंटी दिली आहे. या सर्व आश्वासक वातावरणात शेअर बाजार अजून मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.