---Advertisement---

मोठी बातमी! ‘आरबीआय’ने घातली ‘या’ बँकेवर बंदी, आता कोणताही ग्राहक काढू शकणार नाहीत ‘पैसे’

---Advertisement---

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे बँकेच्या कोणत्याही खातेदाराला आपल्या खात्यातील पैसे काढता येणार नाहीत. हा आदेश 13 फेब्रुवारी 2025 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे खातेदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, अनेक नागरिक बँकेच्या विविध शाखांसमोर जमा झाले आहेत.

बँक बंदीची माहिती मिळताच मुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेबाहेर मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी लोकांना कूपन देण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून लॉकर उघडण्यासाठी काही सुविधा मिळू शकेल. मात्र, ज्या खातेदारांचे पैसे बँकेत जमा आहेत, त्यांना कोणतेही पैसे काढण्याची परवानगी नाही. यामुळे अनेक ग्राहक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही लोकांचे नुकतेच पगार झाले असूनही, ते पैसे काढू शकले नाहीत.

हेही वाचा : मधुचंद्राची रात्र; नववधूनं केलं असं काही की नवऱ्यावर आली रडण्याची वेळ

RBI ने बँकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून हे निर्बंध लागू केले आहेत. बँक कोलमडू नये आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेला कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

मार्च 2024 पर्यंत बँकेत एकूण 2436 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. या ठेवीदारांना “डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन” (DICGC) अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा विमा मिळणार आहे. म्हणजेच, ज्या ग्राहकांच्या ठेवी 5 लाख रुपयांच्या आत आहेत, त्यांना ही विमा रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईतील अंधेरी, वांद्रे, बोरिवली, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, गोरेगाव, नरिमन पॉइंट, कांदिवली, मालाड, मुलुंड, सांताक्रूझ आणि वर्सोवा येथे शाखा आहेत. तसेच, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सुरत येथेही बँकेच्या शाखा कार्यरत होत्या.

खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण

अचानक बँकेवर निर्बंध आल्याने ठेवीदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेकांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी पैसे काढायचे आहेत, मात्र त्यांना परवानगी दिली जात नाही. काही लोकांना आपल्या व्यवसायासाठीही पैशांची गरज असून, हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

RBI कडून या बंदीवर पुनर्विचार होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये बँकेची आर्थिक स्थिती सुधारली, तर काही निर्बंध शिथिल होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment