RCB Captain । मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची मोठी घोषणा; विराट…

RCB Captain । आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी आता दहाही संघ सज्ज झाले आहेत. मेगा ऑक्शनपूर्वी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी काल, 31 ऑक्टोबर रोजी जाहीर केली. आरसीबीने माजी कर्णधार फॅफ डू प्लेसिसला करारमुक्त केले. त्यामुळे विराट कोहली आगामी आवृत्तीत पुन्हा एकदा फ्रँचायझीचे नेतृत्व करेल अशी चर्चा रंगली आहे. त्यावर मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी मोठी घोषणा केली आहे.

तत्पूर्वी हे जाणून घेऊया की, मेगा लिलावात काय होईल. यावेळी मेगा लिलावात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळणार आहे. कारण आरटीएम केलेला खेळाडू परत संघात घेणं खरंच खूप कठीण जाणार आहे. कारण पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पर्समध्ये सर्वाधिक रक्कम आहे. त्यामुळे त्यांच्याशी लिलावात सामना करणं इतर फ्रेंचायझींना कठीण जाणार आहे.

आयपीएल रिटेन्शन यादीत पंजाब किंग्सने सर्वात कमी रक्कम खर्च केली आहे. 120 कोटी रुपयांपैखी फक्त 9.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे पंजाबच्या पाकिटात आता 110.5 कोटी रुपये असणार आहे. त्यामुळे अपेक्षित खेळाडूसाठी हवी ती रक्कम मोजता येणार आहे.

पंजाब किंग्स श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजणार असं दिसत आहे. कारण शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग या दोन अनकॅप्ड खेळाडूंना 9.5 कोटी रुपयात रिटेन केलं आहे. तर आरसीबीने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना कायम ठेवले आहे.

विराट कोहली पुन्हा कर्णधार ?
IPL 2024 मध्ये आरसीबीने १४ पैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. प्लेऑफमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चार विकेट्सने पराभूत झाल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी म्हटले की, तो कर्णधार असो किंवा नसो, कोहली हा एक नैसर्गिक लीडर आहे आणि आमचे प्रशिक्षक IPL2025 मध्ये संघाला योग्य दिशेने नेण्यासाठी त्याच्या उर्जेची वाट पाहत आहोत. आयपीएल २०२४ मध्ये आम्हाला प्ले ऑफमध्ये घेऊन जाणाऱ्या लिडर्सपैकी विराट एक होता. आयपीएल २०२५ मध्ये आम्हाला त्याची हिच लिडरशीप पाहायची आहे.

संचालक मो. बोबट काय म्हणाले ?
“कर्णधारपदाबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही पर्यायांसाठी खुले आहोत. आम्ही फक्त स्पष्ट निर्णय घेतला तो ‘फॅफ’ला कायम न ठेवण्याचा होता. त्याने मागील पर्वात आणि त्याआधीच्या पर्वातही चांगली कामगिरी केली आहे,”असे आरसीबीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये संचालक मो. बोबट म्हणाले.