RCB vs KKR : बंगलोरसाठी पराभवाचा बदला घेण्याची संध्याकाळ!

RCB vs KKR IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज ७.३० वाजता सामना होत आहे. सलग दोन विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहे. आयपीएल 2023 हंगामातील 36 व्या सामन्यात बंगळुरूचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कोलकात्याकडून मागील पराभवाचा बदला घेण्याचीही बंगळुरूसमोर संधी आहे. त्याचबरोबर सलग 4 सामने गमावलेल्या कोलकात्यासमोर विजयाच्या मार्गावर परतण्याचे मोठे आव्हान आहे.