तरुण भारत लाईव्ह । ८ मार्च २०२३। रिअलमी कंपनी ग्राहकांसाठी C सीरीज अंतर्गत एक नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Realme C55 मध्ये iPhone 14 Pro सीरीज सारखं मिनी कॅप्सूल Dynamic Island फीचर मिळणार आहे. चला तर पाहुयात या अपकमिंग मोबाईलचे फीचर्स.
Realme C55 स्मार्टफोन मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन 680 निट्स पीक ब्राइटनेस आणि Apple Dynamic Island सेटअपसह येऊ शकतो. याला कंपनीने मिनी कॅप्सूल असं नाव दिलंय. हा डिस्प्ले तुम्हाला कमी बॅटरी इंडिकेशन आणि फोन चार्जिंग स्टेटस यासारखी माहिती देतो.
याचा प्रोसेसर फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट वापरण्यात आली आहे.
या फोन मध्ये दोन कॅमेरा सेन्सर दिले जाऊ शकतात. 64 मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा फोनच्या पुढील बाजूस आहे. बॅटरी फोनमध्ये 33W फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते.