---Advertisement---

जळगावमध्ये केळीला विक्रमी भाव, सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव, उत्पादनात घट!

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात केळीला विक्रमी भाव देऊन सुद्धा केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यात केळी पिकावर आलेल्या विविध संकटांच्या मालिकेमधील चक्रीवादळ, गारपीट आणि सी एमवी व्हायरसचा झालेला प्रादुर्भावचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे.

सध्या केळी उत्पादनात मोठी घट आली आहे. तसेच यंदा थंडीचा लांबलेला सिझन हा सुद्धा केळी उत्पादकांसाठी अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे केळी उत्पादन कमी प्रमाणात होत आहेत.

केळीच्या दरांमध्ये वाढ
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. जळगावमध्ये 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊन सुद्धा केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुढील महिन्यात मात्र केळीची मोठी आवक होण्याची चिन्हे आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment