३८ हजार ४८० शिक्षकांची लवकरच पदभरती!

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एकलव्य मॉडल रेजिडेंशियल स्कूलमध्ये विविध पदांसाठी तब्बल ३८ हजार ४८० पदांची भरती काढली जाणार आहे.प्राचार्य, उपप्राचार्य, कला-संगीत शिक्षक, पदव्युत्तर शिक्षण आणि अन्य जागांसाठी ही भरती आहे. पण अजून अर्ज करण्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही. यामध्ये १८ हजार ते अडीच लाख रूपयांपर्यत अंदाजे पगार मिळू शकतो.

रिक्त जागांचे तपशील

प्राचार्य – ७४० पदे

उपप्राचार्य – ७४० पदे

पदव्युत्तर शिक्षक – ८१४० पदे

पदव्युत्तर शिक्षक (संगणक विज्ञान) – ७४० पदे

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ८८८० पदे

कला शिक्षक – ७४० पदे

संगीत शिक्षक – ७४० पदे

शारीरिक शिक्षण शिक्षक – १४८० पदे

ग्रंथपाल – ७४० पदे

स्टाफ नर्स – ७४० पदे

वसतिगृह वॉर्डन – १४८० पदे

लेखापाल – ७४० पदे

खानपान सहाय्यक – ७४० पदे

चौकीदार – १४८० पदे

कुक – ७४० पोस्ट

समुपदेशक – ७४० पदे

चालक – ७४० पदे

इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – ७४० पदे

गार्डनर – ७४० पदे

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – १४८० पदे

लॅब अटेंडंट – ७४० पदे

मेस हेल्पर – १४८० पदे

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – ७४० पदे

सफाई कामगार – २२२० पदे

शैक्षणिक पात्रता

१२वी, पदवीधर, बी.एड., डी.एड.

निवड प्रक्रिया

या पदांवरील निवडीअंतर्गत पहिल्या तीन तासांची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखत आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

अर्ज प्रक्रिया

अधिकृत वेबसाइट emrs.tribal.gov.in वर जा.

सर्व माहिती प्रविष्ट करा आणि फी भरा.

सबमिट बटणावर क्लिक करा.

पुढील गरजांसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.