---Advertisement---

रेल्वेत नोकरीची मोठी संधी, उद्यापासून सुरु होणार अर्ज प्रक्रिया

---Advertisement---

RRB Technician Bharti २०२५ : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून, सुमारे ६ हजार ३७४ पदांची भरती करण्यात येणार आहे.

अर्जप्रक्रिया २८ जून २०२५ पासून सुरु होणार असून, अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ असणार असून, इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पदांसाठी भरती


टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी १८० जागा, टेक्निशियन ग्रेड ३ ओपन लाइन पदासाठी ६००० जागा, असे एकूण ६१८० रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.

भरती पात्रता


टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी ऑफ सायन्स फिजिक्स/ कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / इन्स्ट्रुमेशनमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. किंवा बीएससी डिग्री इन फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केलेला असावा.

टेक्निशियन ग्रेड ३ पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी कमाल वयोमर्यादा ३६ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

परीक्षा शुल्क


अर्ज करताना उमेदवारांना ५०० रुपये फी भरायची आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---