---Advertisement---
BSF Constable Tradesman Vacancy 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी संधी चालून आली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २६ जुलै पासून सुरू होणार असून, २५ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार विहित तारखेपासून अधिकृत वेबसाइट bsf.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या एकूण ३५८८ पदांची भरती करणार आहे. एकूण पदांपैकी ३४०६ पदे पुरुष उमेदवारांसाठी आणि १८२ पदे महिलांसाठी राखीव आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किती असावे आणि निवड कशी केली जाईल ते जाणून घेऊया.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षे ते २५ वर्षांच्यादरम्यान असावे. ओबीसी श्रेणीतील अर्जदारांसाठी कमाल वयोमर्यादा ३ वर्षे आणि एससी आणि एसटी श्रेणीतील अर्जदारांसाठी ५ वर्षे शिथिल करण्यात आली आहे.
कसा कराल अर्ज
बीएसएफच्या अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जा.
होम पेजवर दिलेल्या उमेदवार लॉगिनवर क्लिक करा.
तपशील प्रविष्ट करा आणि नोंदणी करा आणि प्रोफाइल तयार करा.
आता अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरा आणि सबमिट करा.
या पदांसाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाईल. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल. अधिक माहितीसाठी, उमेदवार बीएसएफने जारी केलेली भरती सूचना तपासू शकतात.