---Advertisement---
सरकारी नोकरी मिळणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. हे स्वप्न त्याच्या एकट्यापुरते मर्यादीत न राहता ते संपूर्ण कुटुंबाचे असते. आजही तरुण हे खासगी पेक्षा सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येतात. यामागे विविध कारणे आहेत. आताच्या स्पर्धेच्या आणि महागाईच्या युगात प्रत्येकाला चांगल्या नोकरीची नितांत आवश्यकता असते. तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचं तुम्ही सोनं करु शकता…
सुप्रीम कोर्टात मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेला 30 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबरपर्यंत SCI च्या अधिकृत वेबसाइट sci.gov.in वर भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकूण विविध 30 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. म्हणून उशीर न करता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज दाखल करा.
या भरती प्रक्रियेत 16 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 4 जागा अनुसूचित जाती (SC) साठी, 2 पदे अनुसूचित जमाती (ST) साठी आणि 8 पदे इतर मागासवर्गीय (OBC) साठी राखीव आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता काय असावी आणि निवड कशी केली याबद्दल जाणून घेऊ…
अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. यासोबतच, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द आणि कंप्यूटर टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांचा वेग असणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित स्टेनोग्राफी किंवा सेक्रेटरी पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 30 ते 45 वर्षांच्या मध्ये असलं पाहिजे.
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1500 रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या अवलंबितांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. हे पेमेंट युको बँक पेमेंट गेटवे द्वारे करता येईल. अर्जाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे.
निवड प्रक्रिया चार श्रेणींमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वात आधी शॉर्टहँड टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर एक ऑब्जेक्टिव्ह टाईप लिखित परीक्षा होणार आहे. तिसऱ्या श्रेणीत कंप्यूटर टायपिंग स्पीड टेस्ट होणार त्यानंतर सर्वात शेवटी मुलखत होईल. निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 11 अंतर्गत 67 हजार 700 रुपये सुरुवातीचं वेतन असेल. याशिवाय, सरकारी नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील.