रेड वेलवेट केक रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २७ मे २०२३। रेड वेलवेट केक सर्वांचाच आवडता केक आहे. हा केक मऊशार, चीझी आणि बटरसारखा जिभेवर ठेवताच विरघळणारा असल्याने लहान मुलांमध्ये तर तो अतिशय लोकप्रिय मानला जातो. रेड वेलवेट केक घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पं आहे. रेड वेलवेट केक घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
1 कप पावाचे पीठ, 200 ग्रॅम कन्डेंस्ड मिल्क, 100 ग्रॅम बटर, 2 चमचे पिठीसाखर, 1 चमचे कोकोआ पावडर, 1 चमचे व्हेनिला एसेंस, 1 चमचे व्हिनेगर, 1.2 चमचे बेकिंग सोडा, 1 चमचे बेकिंग पावडर, 3.4 चमचे खाद्यतेल रंग, 1 कप ताक, आवश्यकतेनुसार पाणी.

कृती 
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कंडेन्स मिल्क, वितळवलेले बटर, पिठीसाखर घाला आणि सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करुन घ्या. जेणे करुन मिश्रणाच्या गाठी तयार होणार नाहीत. आता त्या मिश्रणात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि व्हेनिला इसेंन्स घाला आणि सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करुन घ्या. आता त्यात ताक आणि खायचा लाल रंग घाला.

एकदा का गाठी नसलेले वेलवेटी रंगाचे आकर्षक मिश्रण तयार झाले की ते केकच्या कप्समध्ये घाला. मिश्रण त्या कप्समध्ये फक्त ३/४ या प्रमाणातच घाला. कारण तयार झाल्यावर केकचा आकार मोठा होता. केक बेक करण्यासाठी ओव्हन १० मिनिटे गरम करुन घ्या. नंतर १५ ते २० मिनिटे केक त्या गरम केलेल्या ओव्हनमध्ये बेक करा.