REELS पाहून सर्व डेटा संपवून देते सासू, सून पोहोचली थेट पोलिसांत

सासू दिवसभर मोबाईलवर रिल्स बघून इंटरनेट डेटा संपवते. सून रात्री मोबाईल वापरण्यासाठी जाते तेव्हा कोणताही डेटा नसतो. याचा संताप येऊन सुनेने पोलिसांत धाव घेऊन थेट सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी सून आणि सासू या दोघांनाही शांत केले.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये ही घटना समोर आली आहे. कोतवाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिची सासू रोज तिच्या मोबाईलमधील रील पाहून सर्व डेटा संपवते करते. महिलेने सांगितले की, तिचा नवरा रोज सकाळी कामावर जातो. यानंतर ती दिवसभर घरच्या कामात मग्न असते. तिच्याकडे मोबाईल बघायलाही वेळ नसतो. रात्री सर्व काम आटोपून ती मोबाईल पाहण्यासाठी जाते तेव्हा डेटा संपल्याचे दिसते.

महिलेने सांगितले की, सर्वप्रथम तिने याबाबत पतीकडे तक्रार केली. यावरून तिचे पतीसोबत भांडणही झाले होते. महिलेने सांगितले की, तिने तिच्या पतीला घरातील मोबाईल फोनशिवाय अमर्यादित डेटा पॅक असलेला मोबाईल फोन मागितला होता. मोबाईल देऊ शकत नसाल तर वेगळे घर घ्या. पतीने महिलेच्या दोन्ही मागण्यांपैकी एकही मान्य न केल्याने दोघांमधील वाद वाढला.

यानंतर महिलेची सासू आणि पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. महिलेने इंटरनेट डेटाबाबत पोलिसांत तक्रार केली आणि सासू आणि पतीवर हुंड्याची मागणी केल्याचा आरोपही केला. यानंतर पोलिसांनी महिला, तिचा पती आणि सासू यांचे समुपदेशन करून तोडगा काढला.