---Advertisement---
जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेले ५० टक्के आयात शुल्क या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात सीसीआयला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभकरण्यासाटी अॅपच्या नोंदणी माध्यमातून प्रक्रिया राबवणार आहे.
यंदा कापसाचा पेरा कमी असल्याने जिनिंग उद्योगाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ही कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे कापसाची भाववाढ होण्याची शक्यता आहे. यंदा मध्यम कापसाचा – हमीभाव ७,७१० रुपये आणि लांब कापसाचा हमीभाव ८,११० रुपये आहे.
खरेदीची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉटही बुक करता येणार आहे.
कपास किसान अॅपवर शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अपडेटेड ७/१२अपलोड करावा लागेल. शेतकऱ्याची सरकार माहिती प्रमाणित करेल.
तसेच लॉगइन आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. माहितीचे प्रामाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्रीकरिता ७दिवसांचा स्लॉट दिला जाईल. या ७दिवसांत कोणत्याही दिवशी व कोणत्याही केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे.