मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचा संबंध तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह : जळगाव :  हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व असते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी पितरांना मोक्ष देणारी एकादशी, असे म्हटले जाते. ३ डिसेंबर २०२२ रोजी मोक्षदा एकादशी व गीता जयंतीही आहे. यांचा संबंध म्हणजे, याच तिथीला भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते, त्यामुळे या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते.

भारतीय तत्वज्ञानातील श्रेष्ठ तत्वज्ञान म्हणजे गीता होय. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी भगवंतांनी गीता सांगितली तो आजचा दिवस. महाभारत युद्ध सुरू असताना अआपल्या हातून समोर उभे असलेले आपले नातलग, गुरू, भाऊ हे मारले जाणार आणि त्यांना मारून मिळालेले राज्य काय कामाचे या संभ्रमात अर्जून अडकला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनला त्या मोहातून बाहेर काढले होते. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती. तेव्हापासून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटले जाते.

मोक्षदा एकादशी व्रत

या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीचे किंवा फोटोचे पुजन करावे. श्रीकृष्णाच्या मुर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला खडिसाखरेचा नैवैद्य दाखवा. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळे खाऊनदेखील तुम्ही हे व्रत करू शकता. हे व्रत केल्याने दुसर्‍या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी. हिंदू धर्मात एकादशीचे व्रताचे विशेष महत्त्व आहे.