नात्यांमधील सुसंवाद

 

कानोसा

– अमोल पुसदकर

पूर्वी कोणी एकटा नव्हता. (Family Communication) प्रत्येकाला आई-वडील, बहीण-भाऊ, मामा-मामी, मावशी-काका व हे कमी झाले म्हणून की काय मानलेलेसुद्धा नाते असायचे.

त्यामुळे माणूस हा एकटा नव्हता. मामाकडे, मावशीकडे, बहिणीच्या सासरी राहून शिक्षण पूर्ण केलेली अनेक उदाहरणे आपल्याजवळ आहेत. खेड्यातील नातेवाईक मुलीच्या लग्नाच्या वेळी तिला दाखवण्यासाठी शहरातील नातेवाईकांकडे आणून ठेवायचे व इथेच दाखवण्याचे कार्यक्रम होत राहायचे. त्यात कुणाला काही अवघड वाटत नव्हते. प्रत्येक जण आपल्या नात्याच्या हक्कामुळे येऊन राहायचा. लग्न समारंभ असले की पाहुणेराहुणे खूप यायचे. अगदी आठ-दहा दिवससुद्धा त्यांचा मुक्काम असायचा. घर गजबजलेलं असायचं. प्रत्येकामध्ये संवाद होता. त्यामुळे भावभावना एकमेकांना कळत होत्या.

सर्वजण भावनेने, प्रेमाने बांधले गेलेले होते. काळ बदलत गेला. संवाद कमी होत गेला. भावना तर राहिल्याच नाहीत. पूर्वी लग्नासाठी आठ-आठ दिवस येऊन राहणारे पाहुणे आता (Family Communication) लग्नाच्या दिवशीच किंवा फार फार तर आदल्या दिवशी येतात. व लग्न झालं की संध्याकाळची गाडी पकडून आपापल्या घरी रवाना होतात. पूर्वी मामा-मावशीकडे राहून शिक्षण घेणारे विद्यार्थी आता होस्टेलमध्येच राहणे पसंत करतात. पूर्वी मामा भाचीच्या लग्नाची काळजी करायचा. आता भाची किंवा तिचे आई-वडील तिचे पाहायला सक्षम आहेत. पूर्वी लोक दूर राहायचे. दळणवळणाची साधनं कमी होती. तरीपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जरूर भेटायचे. भेटायची ओढ होती. आता साधने वाढलेली आहेत. संपूर्ण जग जवळ आलेले आहे. पण मन मात्र दूर गेलेले आहे. त्यामुळे पूर्वी एकमेकांना हमखास भेटणारे नातेवाईकसुद्धा आता एकमेकांना भेटेनासे झालेले आहेत. कसेबसे लग्नाच्या निमित्ताने भेटतात. तेवढेच. एकंदरीत संवाद कमी होत चाललेला आहे.

नवरा बायकोशी बोलतो तेही कामापुरतं. (Family Communication) बायको बोलते तेही कामापुरतं. आई-वडील मुलांशी बोलतात तेही कामापुरते. उठला का? तयारी झाली का? किती वेळ लावतोस? असे संवाद आहेत. बायकोसुद्धा नवर्‍याला हे आणले का? ते आणले का? ते का नाही आणले? आपल्याला कुठे जायचे आहे? केव्हा जाणार? असे प्रश्न विचारते. तर, नवरा अजून झाले नाही का? तुला सांगितले होते ना! अशा पद्धतीचे संवाद बोलत असतो. घरातील म्हातारे आई-वडील आपसात बोलत असतात, पण त्यांच्याशी बोलायला कोणाला वेळ नाही. आजकाल माझे निर्णय हे माझे किंवा फार फार तर माझे व माझ्या बायकोचे आहेत. आई-वडिलांचा निर्णयामध्ये सहभाग काही नाही. जरी करणारा मी आहे. पैसे खर्च करणारा मी आहे. तरीहीसुद्धा आई-वडिलांना विचारलं तर बिघडते कुठे? परंतु संवादच नसल्यामुळे त्यांना विचारणे दुरापास्त झालेले आहे. संपूर्ण परिवाराने एकत्र बसणे.

दिवसभरात घडलेल्या गोष्टींची चर्चा करणे, त्याबद्दलची माहिती मुलांना देणे, त्या घटनेचे अर्थ त्यांना समजावून सांगणे हे बंद झालेले आहे. बँकेत पैसे असतील तर तुम्ही काढू शकाल. नात्यांचेही तसेच आहे. मायेचा ओलावा असेल तर तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील अन्यथा त्या निष्फळ होतील. (Family Communication) एखाद्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता असेल तर त्याच्याशी तेवढे संबंध पाहिजे. जेणेकरून तो तुमचा ऐकेल. शेजारच्यांची गोष्ट असू द्या, परंतु घरातल्या मुलामुलींकडेसुद्धा लक्ष देण्यास आम्हाला तेवढा वेळ नाही. आम्ही त्यांना फक्त साधन पुरविणारे झालेलो आहोत. त्यांच्या भावनिक गरजांची पूर्तता मात्र होताना दिसत नाही किंवा आम्ही ते समजून घेत नाही, असेही होऊ शकते. यासाठी त्यांना वेळ देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. धर्मामुळे नैतिक मूल्य मिळतात. धर्म ही नैतिक मूल्यांची संपत्ती आहे. आमचे सर्व रीतीरिवाज, आमची संस्कृती या सर्व गोष्टी नैतिकतेची शिकवण देणारे आहेत. परंतु सणांच्या मागे असलेला अर्थ, त्यामागची कथा, आम्ही मुलांना सांगत नाही किंवा आम्ही सांगणे बंद केलेले आहे आणि त्यांचे ऐकणे पण बंद झालेले आहे. त्यांचे ऐकणे बंद झाले असले, तरीसुद्धा सांगण्याची आवश्यकता ही आमचीच आहे. आम्हाला ती पूर्ण करायची आहे. कारण आज जर त्याला सणवार, रीतीरिवाज, संस्कृती, धर्म माहीत झाला नाही तर उद्या तो एक कोरडा मनुष्य होईल. आमच्या देशांवर शेकडो वर्षे मुघलांची आक’मणे सुरू होती.

बादशाह्या सुरू होत्या. त्यानंतर दीडशे वर्षं इंग्रज होते. राज्यकर्ते कुणीही असले तरी आमचा धर्म जिवंत राहिला. याला कारण आम्ही पिढी दर पिढी त्या विचारांना संक्रमित करीत राहिलो. आमच्या आजोबांनी वडिलांना, वडिलांनी आम्हाला धर्म दिला. आम्ही तो आमच्या भावी पिढीला दिला पाहिजे. ही जबाबदारी आमची आहे. (Family Communication) टीव्ही-मोबाईलच्या जगामध्ये सर्व लोक त्यात गुंतून बसलेले आहेत. कोणाला कोणासाठी वेळ नाही. छोट्याशा राजूला म्हटले, ‘राजू इकडे ये’ तर राजू म्हणतो, ‘लवकर सांगा, मला वेळ नाही.’ शाळेत जाणार्‍या दादाला म्हटले, ‘अरे इकडे येतोस का?’ तर तो म्हणतो, ‘लवकर सांगा, माझा ऑटो येणार आहे.’ कॉलेजमध्ये जाणार्‍या ताईला म्हटले, ‘ताई ऐकतेस का जरा!’ तर ताई म्हणते, ‘आता नाही. मला आता वेळ नाही. नंतर ऐकते.’ दादाला म्हटले तर दादा कानामध्ये हेडफोन घालून आहे; त्याला तर ऐकायला वेळच नाही. ऑफिसात जाणार्‍या बाबांना म्हटले तर ते म्हणतात, ‘हा लवकर सांगून टाक. मला आता जायचे आहे.’ आईला म्हटलं तर आई म्हणते, ‘मी कामात आहे.’ प्रत्येक जण कामात आहे. कोणालाच वेळ नाही अशी परिस्थिती आहे. अशाने नात्यांना पाठबळ कसे मिळेल? नाते फुलतील कसे? बहरतील कसे? त्यांना खतपाणी घालण्याची आवश्यकता आहे. त्यांना फुलविण्याची आवश्यकता आहे. जर ते फुलले, बहरले तर कोणालाही मी एकटा आहे, असे वाटणार नाही. माझे यश हे माझे यश आहे. परंतु माझे यश हे आमच्या सर्वांचे आहे, हे म्हणण्याची सवय लागेल.

माझे अपयश हे माझे असेल तरी त्या अपयशांमध्ये (Family Communication) माझ्यासोबत माझा परिवार उभा राहील. माझे नातेवाईक उभे राहतील. आई-वडील मुलांच्या जन्माला पुरणार नाहीत. आमच्या नंतर म्हणजे आई-वडिलांचे आयुष्य संपल्यानंतरसुद्धा मुलांकडे बघायला, त्यांची काळजी घ्यायला कोणीतरी असायला पाहिजे. हे कोणीतरी म्हणजे आमचे मित्र असू शकतात, आमचे नातेवाईक असू शकतात. हे सर्व लोक भविष्यकाळात आमच्या मुलांसोबत राहणार आहेत. त्यामुळे या सर्वांशी संवाद निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याशी भावनिक संबंध निर्माण करण्याची आवश्यकता आहे. संवाद हा सुसंवाद असला पाहिजे. आमच्यात कटुतेचे प्रसंग आले असतील. कदाचित येतीलही. परंतु, ती कटुता ज्या विषयाबद्दल असेल त्या विषयाबद्दलच मर्यादित ठेवायला हवी. एक उदाहरण मला माहिती आहे. अण्णासाहेब नावाचे गृहस्थ होते. ते एका शाळेचे संचालक व अध्यक्षही होते. काही काळानंतर त्यांनी काही नवीन लोकांना संचालक मंडळात घेतले. त्यात एका तरुण व्यक्तीला अध्यक्ष होण्याचा मोह झाला. त्याने अध्यक्ष पदावर दावा केला. कोर्टात केस उभी राहिली.

एके दिवशी अण्णासाहेब त्या गावी गेले. तडक त्या तरुण अध्यक्षाच्या घरी गेले. त्याच्याच (Family Communication) घरी आंघोळपांघोळ करून जेवण करून त्याच्यासोबत कोर्टात गेले व केस लढले. यावरून आपल्या असे लक्षात येईल की, अण्णासाहेबांच्या मनात कोर्टातला विचार हा कोर्टापुरता मर्यादित होता. त्यांच्या मनात कुठलीही कटुता नव्हती. आम्हीसुद्धा नात्यांमधील कटुता ही मर्यादित स्वरूपात ठेवायला पाहिजे. आनंदाचे प्रसंग आम्ही एकत्र येऊन आनंद साजरा करायला पाहिजे. कटुता हे जीवन नाही. नेहमीच ती कटुता घेऊन एकमेकांबद्दलचे मत खराब करीत एकमेकाला दूषणे देत जीवन जगणे यात मजा नाही. आमचा जीवन प्रवास हा आनंदाचा झाला पाहिजे. यासाठी सखेसोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी हे सगळे आमच्या सोबत आहेत. आम्ही सगळे सोबत राहू, आनंदी राहू यासाठी सुसंवाद साधू, असा निश्चय करायला पाहिजे.ती प्रदान करणारा आहे.