पावसाचा दिलासा; हतनूर, गिरणा जलसाठ्यात वाढ

तरुण भारत लाईव्ह । १९ सप्टेंबर २०२३। शहरासह जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठ्यात वाढ होऊन ५५.२९ टकके वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, या मोठ्या धरणात एकूण ६०.४०टक्के जलसाठा आहे. हतनूर प्रकलपात एकूण २५५ दशलक्ष घनमीटर अर्थात ९.००४ टीएमसी जलसाठ्याची असून सद्या स्थितीत १३३.०० दशलक्ष घन मीटर अर्थात ४. ७० टीएमसी जलसाठा आहे. म्हणजेच ५२. १६ टक्के जलसाठा आहे. तर आठ गेट पूर्ण उगडले आहेत. गिरणा प्रकल्पात एकूण ५२३.५५ दशलक्ष घनमीटर अर्थात १८.४८७ टीएमसी जलसाठ्याची क्षमता असून सद्य स्थितीत २८४. ७५ दशलक्ष घनमीटर अर्थात १०.५ टीएमसी जलसाठा आहे. म्हणजेच ५४.३९ टक्के जलसाठा आहे.

वाघूर प्रकल्पात एकूण २४८.५५ दशलक्ष घनमीटर अर्थात ८.७७६टीएमसी जलसाठा आहे. म्हणजेच ८२.७१ टक्के जलसाठा आहे. तिन्ही प्रमुख प्रकल्पात एकूण ६०.७० टक्के जलसाठा आहे. दरम्यान १३ मध्यम प्रकल्पात ४९.९२ टक्के जलसाठा आहे. या १३ मध्यम प्रकल्पांमध्ये अभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर, हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तसेच हिवरा व मन्याड हे पूर्णपणे कोरडे आहेत.जिल्ह्यात ९६ लघु प्रकल्प असून त्यांच्यात ३३.३९ टक्के जलसाठा आहे. सर्व मोठे मध्यम व लहान प्रकल्प मिळून जिल्ह्यात ५५.२९ टक्के जलसाठा आहे.