तरुण भारत लाईव्ह । १ एप्रिल २०२३। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आज १ एप्रिल सरकारने मोठी भेट दिली आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. आज व्यावसायिक सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जारी केले जातात. त्यानुसार आज व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले. यातून लोकांना दिलासा मिळणार आहे. मागील महिन्यातच व्यावसायिक सिलिंडरमध्ये ३५० रुपयांची वाढ करण्यात आली होती याशिवाय घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच रक्कम भरावी लागेल.
आज १ एप्रिलपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत दिल्लीत २०२८ रुपये, कोलकात्यात २१३२ रुपये, मुंबईत१९८० रुपये आणि चेन्नईमध्ये २१९२.५० रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत दिल्लीत २११९.५० रुपये, कोलकात्यात २२२१.५० रुपये आणि मुंबईत २०७१.५० रुपये होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत१४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १,१०३ रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये १,१२९ रुपयांना उपलब्ध असेल. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ११०२.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला रु.१११८.५० द्यावे लागतील.