---Advertisement---

सर्वसामान्यांना दिलासा; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी कपात, पहा आताचे नवीन दर

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ५ मे २०२३।  सर्वसामान्यांना एक दिलासादायक बातमी आहे. पुढील आठवड्यापासून खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे लोकांना मोठा फायदा होणार आहे. मदर डेअरीने ‘धारा’ ब्रँड अंतर्गत विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत कमी केली आहे.

मदर डेअरीने खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत १५ ते २० रुपये प्रति लिटरने कमी केली आहे. जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमती घसरत असताना कंपनीने हे पाऊल उचलले आहे. किंमत कपात तत्काळ प्रभावाने लागू आहे. नवीन एमआरपीसह धारा तेल पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अन्न मंत्रालयाने सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया  या खाद्यतेल उद्योग संस्थांना स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती कमी करण्याचे निर्देश दिले होते. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “धारा खाद्यतेलाच्या किमती १५ ते २० रुपयांनी कमी झाल्या आहेत. सोयाबीन तेल, तांदळाच्या कोंडा तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेल अशा विविध प्रकारांमध्ये ही कपात करण्यात आली आहे.

दर कपातीनंतर धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची एक लिटर  किंमत १७० रुपयांवरून १५० रुपयांवर आली आहे. धारा रिफाइन्ड राइस ब्रानची किंमत १९० रुपयांवरून १७० रुपये प्रति लिटरवर आली आहे. धारा शुद्ध सूर्यफूल तेलाची किंमत १७५  रुपयांवरून १६० रुपये प्रति लिटरवर आली आहे. तसेच शेंगदाणा तेलाचा दर २५५ रुपयांवरून २४० रुपये प्रतिलिटर झाला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment