रावेर : तालुक्यातील भामलवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आज ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. गाई, गुरे ढोरे घेऊन थेट तहसीलदार धडक मारली आणि घंटानाद ठिय्या आंदोलन केले. तसेच जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण आहे.यामुळे गावातील गाई इतर गुरांना चारण्यासाठी अडचणी येत येत आहेत.गायरान जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण निर्मूलन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती.मात्र गुरांची चाऱ्या अभावी होणारी आभाळ पाहून ग्रामस्थ व्यथित झाले.शेवटी ग्रामस्थांनी गाई, गुरांना घेऊन थेट रावेर तहसील धडक दिली. राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या देऊन आणि घंटानाद आंदोलन केले.
व्हिडीओ पहा या खालील लिंक ला टच करा
https://fb.watch/piHsZEMHEa/?mibextid=RtaFA8
अनोखे आंदोलन
गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी मागणीसाठी थेट गुरांना तहसील गाठून अनोखे आंदोलन ग्रामस्थांनी केले.तहसिल कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिकांमध्ये याबाबत चर्चा होती. आमच्या गुरांना चारा द्या चारा द्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढलेच पाहिजे अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी देऊन
परिसर दणाणून सोडला.
आश्वासन नंतर आंदोलन मागे
भामलवाडी गायरान जमिनीवरील अतिक्रमण दि.९ जानेवारी रोजी काढण्यात येईल असे लेखी पत्र प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलनाचा समारोप झाला.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे फौजदार दिपाली पाटील , गटविस्तार अधिकारी प्रवीण शिंदे , पो.का. पुरुषोत्तम पाटील , सचिन घुगे, स्वप्निल पाटील उपस्थित होते.