तरुण भारत लाईव्ह । २५ जानेवारी २०२३। देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला असून एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मोठी बातमी; प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट
by Mugdha Bhure
Updated On: जानेवारी 25, 2023 7:08 pm

---Advertisement---
२६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देश भरात साजरा केला जातो. आणि मुंबई मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठी परेड होत असते. या दिवशी मोठमोठे नेतेमंडळी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिन दरवर्षी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावेळी मुंबईच्या महापौरांसह पालकमंत्री आणि इतर मंत्री तसेच आमदारही उपस्थित असतात. मात्र, यंदा शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शिवाजी पार्क वर यावर्षी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून, 17 चित्ररथाचे पथसंचलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या खात्यांची माहिती पटवून देणारे हे सर्व चित्ररथ आहेत. शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.