---Advertisement---

Republic Day : चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक परेडमध्ये आघाडीला; पहा व्हिडिओ

---Advertisement---

Republic Day : देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. याचा प्रमुख राष्ट्रीय सोहळा राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या कर्तव्य पथावर १०० हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून या परेडची सुरूवात केली आहे.

या महिला कलाकारांनी शंख, नादस्वरम, नगाडा, ढोल-ताशा इत्यादी पारंपारिक वाद्ये वाजवून या परेडची सुरूवात केली. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे या महिलांच्या वाद्य पथकामध्ये महाराष्ट्रातील चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक आघाडीला असल्याचे दिसून आले. या महिलांनी ढोल-ताशा, शंख इत्यादी वाद्ये वाजवत या परेडची दिमाखात सुरूवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment