देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. याचा प्रमुख राष्ट्रीय सोहळा राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडणार आहे. या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यंदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही यावेळी उपस्थित आहेत.
यावेळी प्रथमच तीनही सैन्यदल, निमलष्करी गट आणि पोलीस दलाचे नेतृत्व महिला करत आहेत. तिन्ही सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व भारतीय लष्कराचे कॅप्टन शरण्य राव करत आहेत. केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकडीत महिला कर्मचारीही सहभागी झाल्या आहेत. BSF, CRPF आणि SSB च्या महिला कर्मचारी 350CC रॉयल एनफिल्ड बुलेटवर स्वार होऊन साहसाचे दर्शन घडवणार आहेत. तर कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन होत आहेत.