मोठी बातमी! नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; भुसावळ, सावदा नगरपालिका SC महिलांसाठी राखीव

---Advertisement---

 

जळगाव : दिवाळीच्या दोन दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आचारसंहिता राज्यात लागू होण्याची शक्यता आहे, असे संकेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. अशातच आज महाराष्ट्रातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. अर्थात ३३ नगरपरिषदांपैकी १६ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. यात मोहोळ, ओझर, भुसावळ, सावदा, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत दिसणार आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल. यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला लागू, असे आवाहन तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वांत महत्त्वाची ही निवडणूक आहे. तसेच जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. अनुभवावरून हा अंदाज वर्तवल्याचे त्यांनी सांगितले होते.

अशातच आज महाराष्ट्रातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. अर्थात ३३ नगरपरिषदांपैकी १६ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. यात मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे.

33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर

भडगाव (जळगाव)

वणी

पिंपळनेर (धुळे)

उमरी (नांदेड)

यवतमाळ

शेंदूरजनघाट

67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिला आरक्षित


भगूर – ओबीसी महिला
इगतपुरी – ओबीसी महिला
विटा – ओबीसी महिला
बल्हारपूर – ओबीसी महिला
धाराशिव – ओबीसी महिला
भोकरदन – ओबीसी महिला
जुन्नर – ओबीसी महिला
उमरेड – ओबीसी महिला
दौडं – ओबीसी महिला
कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
हिंगोली – ओबीसी महिला
फुलगाव – ओबीसी महिला
मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
शिरूर – ओबीसी महिला
काटोल – ओबीसी महिला
माजलगाव – ओबीसी महिला
मूल – ओबीसी महिला
मालवण – ओबीसी महिला
देसाईगंज – ओबीसी महिला
हिवरखेड – ओबीसी महिला
अकोट – ओबीसी महिला
मोर्शी – ओबीसी महिला
नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
औसा – ओबीसी महिला
कर्जत – ओबीसी महिला
देगलूर – ओबीसी महिला
चोपडा – ओबीसी महिला
सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
बाळापूर – ओबीसी महिला
रोहा – ओबीसी महिला
कुरडुवादी – ओबीसी महिला
धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
वरोरा – ओबीसी महिला

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---