---Advertisement---

PM Modi : महिलांचा आदर हेच विकसित भारताच्या दिशेने पहिले पाऊल!

---Advertisement---

नवी दिल्ली : मला कोट्यवधी माता, बहिणींचे आशीर्वाद लाभल्याने मी स्वतःला जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती समजतो. आई आणि बहिणींचे आशीर्वाद ही माझी सर्वांत मोठी ताकद व सर्वांत मोठे संरक्षक कवच आहे. महिलांचा आदर करणे हेच विकसित भारताच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरातमधील नवसारी येथे लखपती दीदींशी संवाद साधल्यानंतर मोदींनी येथून जवळच असलेल्या वंसी बोरसी गावात ‘गुजरात यशस्वी’ आणि ‘गुजरात मैत्री’ या दोन योजनांचा शुभारंभकरताना २५ हजारांवर महिला बचत गटांमधील २.५ लाख महिलांना ४५० कोटी रुपयांचे वाटप केले.

कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात महिलांचे योगदान अतुलनीय आहे. पंतप्रधान आवास योजनेतून लाखो घरे आणि शौचालये देऊन आमच्या सरकारने महिलांचा आदर केला. महिलांनी बँक खाती उघडून त्यांना सक्षम बनवले. उज्ज्वल योजनेंतर्गत त्यांना गॅस सिलेंडर दिले आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

पूर्वी महिलांना १२ आठवड्यांची प्रसूती रजा मिळत होती, पण आम्ही ती वाढवून २६ आठवडे केली. तिहेरी तलाक आणि कलम ३७० वर भाष्य करताना मोदी म्हणाले, मुस्लिम महिलांनी संरक्षणाची मागणी केली होती, त्यामुळे तिहेरी तलाक कायदा आणला. जेव्हा काश्मीरमध्ये कलम ३७० लागू होते, तेव्हा तेथील महिलांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते, आमच्या सरकारने हे कलम हटवल्यानंतर तेथील महिलांना देशातील इतर महिलांप्रमाणे समान अधिकार आहेत.

तीन कोटी महिलांना मिळाले हक्काचे घर
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगात सर्वांत जास्त महिला वैमानिक आपल्या देशात आहे. हे पाहून आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. हे महिला सक्षमीकरणाचे एक उदाहरण आहे. राजकारण, क्रीडा, न्यायव्यवस्था किंवा पोलिस देशाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक आयामात महिलांचा झेंडा उंच फडकत आहे. २०१४ पासून सुमारे ३ कोटी महिला गृहिणींना हक्काचे घर मिळाले. आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गावात पाणी पोहोचत आहे. गांधीजी म्हणायचे की, देशाचा आत्मा ग्रामीण भारतात राहतो. आज मी त्यात आणखी एक ओळ जोडतो, ग्रामीण भारताचा आत्मा ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment