जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बस आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अशोक यशवंत सपकाळे (रा. किनगाव खुर्द) असे मृताचे नाव आहे. ही घटना यावलच्या किनगाव गावाजवळ घडली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
यावल आगाराची बस (क्र. एमएच-१४ बीटी-२१४४) जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल (क्र. एमएच-१९ एटी-८५८८) यांच्यात किनगाव गावाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार सपकाळे एसटीच्या पुढील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
मयत अशोक सपकाळे हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. संध्याकाळी यावल पोलिस ठाण्यात ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.