तरुण भारत लाईव्ह । २४ ऑगस्ट २०२३। काही काळानंतर ग्रह आपली राशी बदलत असतात. आजपासून बुध प्रतिगामी होत आहे. बुध हा ग्रह संवाद, व्यापार याचा कारक आहे. आज एकूण पाच ग्रह प्रतिगामी झाले आहेत. शनि आणि शुक्र आधीच प्रतिगामी आहेत. याचा परिणाम काही राशींवर होणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
मेष राशीच्या लोकांना त्यांचे नशीब साथ देईल. नोकरी आणि व्यवसायातही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. वडिलांशी संबंध दृढ होतील.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना हा काळ अनेक नव्या संधी देतील. उत्पन्न वाढेल. कुटुंबात सुख-समृद्धी येईल.
सिंह रास
या राशींच्या लोकांना हा काळ अनुकूल असणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढेल.
तूळ रास
या राशींच्या लोकांना हा काळ यश देणारा ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य चांगले राहील. शुभवार्ता मिळतील.