प्रवाशांनो, लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांची परतीची वाहतूक ‘या’ तारखेपासून होणार सुरु

---Advertisement---

 

जळगाव : दिवाळी व छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उत्तरेकडील राज्यांसाठी सुरू केलेल्या विशेष गाड्यांची परतीची वाहतूक ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या मुंबई (सीएसएमटी/एलटीटी), तसेच पुणे आणि हडपसर स्थानकांकडे परतणार आहेत.

क्र. ०१०३२ बनारस-सीएसएमटी ही गाडी दुसऱ्या दिवशी १२:२५ वाजता भुसावळला पोहोचेल आणि ४:१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. क्र. ०१०८० गोरखपूर-सीएसएमटी विशेषः दुसऱ्या दिवशी ३:२० वाजता भुसावळला आणि १२:४० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

क्र. ०११४४ दानापूर-एलटीटी ही गाडी रात्री ९:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ८:२५ वाजता भुसावळला आणि ४:५० वाजता एलटीटीला पोहोचेल. क्र. ०५५८५ सहरसा-एलटीटी ही गाडी संध्याकाळी ५:४५ वाजता सुटून पुढील दिवशी १०:१० वाजता भुसावळला आणि ५:३० वाजता एलटीटीला पोहोचेल. क्र. ०१०५२ बनारस-एलटीटी विशेषः स दुसऱ्या दिवशी ८:१० वाजता भुसावळला आणि ४:४० वाजता एलटीटीला पोहोचेल.

क्र. ०१४१६ गोरखपूर-पुणे ही गाडी सायंकाळी ५:३० वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे ५:०० वाजता भुसावळला आणि दुपारी ३:१५ वाजता पुण्यात पोहोचेल. क्र. ०१४१२ सांगानेर-पुणे विशेषः सकाळी ११:३५ वाजता सुटून पुढील दिवशी सकाळी ६:२७ वाजता कल्याणला आणि नंतर ९:३० वाजता पुण्याला पोहोचेल. क्र. ०१४५० दानापूर-पुणे ही गाडी सकाळी ५:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:५० वाजता भुसावळला आणि ६:१५ वाजता पुण्याला पोहोचेल. क्र. ०१४५८ दानापूर-हडपसर विशेषः संध्याकाळी ७:०० वाजता सुटून पुढील दिवशी सकाळी ७:०० वाजता भुसावळला आणि ६:२० वाजता हडपसरला पोहोचेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---