Rinku Singh: भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू रिंकू सिंह बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. रिंकू सिंह लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांचा विवाह सोहळा वारणसी येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार पडणार आहे. प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत.
दोघांचा साखरपुडा ८ जून रोजी लखनौमधील एका हॉटेलमध्ये होणार आहे. या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यामंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव सह कुटुंब उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार १८ नोव्हेंबर २०२५ रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहे.
देशभरातील प्रसिद्ध राजकारणी, क्रिकेटपटू, चित्रपट तारे आणि सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हे नाते निश्चित झाले आहे. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला आणि आता एका नवीन सुरुवातीसाठी सज्ज आहेत. प्रिया आणि रिंकू एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात.
रिंकू सिंहचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी अलीगडमधील एका अतिशय साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील खानचंद्र गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर वाटपाचे काम करायचे. सुरुवातीला त्यांनी स्वतः वडिलांना सिलिंडर वाटपाच्या कामात मदत केली आणि गरिबीशी झुंज दिली आणि क्रिकेटच्या मैदानावर आपले स्थान निर्माण केले.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज प्रेमात कसे पडले ?
असे म्हटले जाते की प्रिया सरोज आणि रिंकू सिंग यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. त्या फ्रेंडचे वडील देखील क्रिकेटपटू आहेत. दोघेही एकमेकांना एक वर्षापासून ओळखतात. दोघेही एकमेकांना आवडतात. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी याबद्दल बोलले आणि आता कुटुंबियांच्या संमतीने त्यांचे लग्न अंतिम झाले आहे.