---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल, पोलिसांवरही हल्ला, गोळीबारात एक जखमी

---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नामांतराच्या महिन्याभरानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला. रामनवमीच्या पार्श्वभूमी किराडपुर्‍यातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसर्‍या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यांची वाहने दगडफेक करुन फोडली. या हल्ल्यात २ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता.

गुरुवारी साजरा होणार्‍या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुर्‍यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच तणावाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन काही क्षणातच एका गटाने मंदिराच्या दिशेने दगडफेक केली.

जीव वाचवण्यासाठी काही लोक मंदिरात घुसले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला, मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली होती. मंदिरासमोर उभे असलेले पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले. जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment