---Advertisement---
---Advertisement---
Rishabh Pant : अंगठ्याला फ्रॅक्चर असूनही, मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला आहे. बीसीसीआयने ऋषभ पंतबद्दल एक मोठी अपडेट जारी केली आहे.
बुधवारी या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३७ धावांवर फलंदाजी करताना पंतला दुखापत झाली होती. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना पंतला दुखापत झाली.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की ऋषभ पंत यापुढे या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक राहणार नाही. ध्रुव जुरेल आता पंतच्या जागी मँचेस्टर कसोटीत यष्टीरक्षक म्हणून राहील. बीसीसीआयच्या या अपडेटमुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे तो या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग करू शकणार नाही. त्याची विकेटकीपिंगची जबाबदारी ध्रुव जुरेलकडे सोपवण्यात आली आहे.
ऋषभ पंतला कशी झाली दुखापत ?
भारतीय डावाच्या ६८ व्या षटकात ख्रिस वोक्सच्या एका वेगवान यॉर्कर बॉलने पंतला अडचणीत आणले. पंतने या चेंडूवर रिव्हर्स-स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थेट त्याच्या बुटावर लागला. या जोरदार प्रहारानंतर पंत वेदनेने ओरडताना दिसला. मैदानावर उपस्थित असलेल्या फिजिओने ताबडतोब त्याची तपासणी केली आणि त्याच्या पायातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. वेदना आणि दुखापतीची तीव्रता पाहता, पंत पुढे फलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर, त्याला ग्राउंड अॅम्ब्युलन्समध्ये मैदानाबाहेर नेण्यात आले.