---Advertisement---
---Advertisement---
Rishabh Pant injury Update : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पंतच्या पायाला फॅक्चर झाल्यामुळे त्याला सहा आठवड्यांचा विश्रांती घेण्याचा सल्ल्ला देण्यात आला आहे, त्यामुळे आता या कसोटीत पंत खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
ऋषभ पंतला कशी झाली दुखापत ?
भारतीय डावाच्या ६८ व्या षटकात ख्रिस वोक्सच्या एका वेगवान यॉर्कर बॉलने पंतला अडचणीत आणले. पंतने या चेंडूवर रिव्हर्स-स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थेट त्याच्या बुटावर लागला. या जोरदार प्रहारानंतर पंत वेदनेने ओरडताना दिसला. मैदानावर उपस्थित असलेल्या फिजिओने ताबडतोब त्याची तपासणी केली आणि त्याच्या पायातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. वेदना आणि दुखापतीची तीव्रता पाहता, पंत पुढे फलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर, त्याला ग्राउंड अॅम्ब्युलन्समध्ये मैदानाबाहेर नेण्यात आले.
दरम्यान, त्याला किती दुखापत झाली आहे, याबाबत अपडेट समोर आले असून, पंतच्या पायाला फॅक्चर झाल्यामुळे त्याला सहा आठवड्यांचा विश्रांती घेण्याचा सल्ल्ला देण्यात आला आहे, त्यामुळे चौथ्या कसोटीत पंत खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
लियाम डॉसनने इंग्लंडविरुद्ध आपला निर्णय दिला आहे. त्यांच्या मते, पंत आता मँचेस्टर कसोटीत खेळताना पाहू शकत नाही. मँचेस्टर कसोटीतील पहिल्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत आलेल्या लियाम डॉसनने ऋषभ पंतबद्दल सांगितले की तो एक अद्भुत खेळाडू आहे. परंतु, त्याला झालेली दुखापत किरकोळ वाटत नाही. मला आशा आहे की सर्व काही ठीक होईल. परंतु, मी त्याला मँचेस्टर कसोटीत पुढे खेळताना पाहू शकत नाही.