ऋषभ पंतने घेतला शानदार झेल, तरीही रोहित शर्माने फटकारले; पहा व्हिडिओ

टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध बार्बाडोसमध्ये सुपर-8चा पहिला सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने अतिशय चांगले प्रदर्शन करत अफगाणिस्तान संघाचा 47 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात भारतीय खेळाडूंनी आपली ताकद दाखवली. या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात एक गमतीशीर घटनाही घडली.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 181 धावा केल्या. अफगाणिस्तान संघ त्याचा पाठलाग करताना, पॉवर प्लेमध्येच 3 विकेट गमावल्या. यानंतर गुलबदिन नायबसह अजमतुल्ला उमरझाईने डाव सांभाळला. 11व्या षटकात कुलदीपने दुसरा चेंडू गुगली टाकला. त्यावर गुलबदिन शॉट खेळण्यासाठी चूकला आणि चेंडू त्याच्या बॅटवर लागून वर उंच उडाला.

यावेळी यष्टीरक्षण करणाऱ्या पंत मी झेल घेतो म्हणून ओरडत पळला. त्यावेळी चेंडू झेलण्याची संधी रोहितकडेही होती, कारण तोही जवळच होता. मात्र, पंतने आवाज दिल्याने त्याने तो चेंडू झेलला. पण पंतचा झेल घेण्यासाठीचा एकूण उत्साह पाहुन रोहितने गमतीशीर प्रतिक्रिया दिली. त्याने ठीक अशा प्रकारचे हावभाव पंतने झेल घेतल्यानंतर केले.

त्यावेळी पंतने झेललेला चेंडू त्याच्याकडे फेकलाही, पण रोहितने तो मस्करीत घेतला नाही. यानंतर भारतीय संघाने विकेट मिळाल्याचे सेलीब्रेशन केले. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.