---Advertisement---

शनी ग्रहाचा उदय; ‘या’ राशीच्या लोकांना व्हावे लागेल सावध

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २१ फेब्रुवारी २०२३। शनी ग्रहाचा कुंभ राशीमध्ये ५ मार्च ला उदय होणार असून, शनीच्या सामर्थ्याने काही राशींना लवकरच भाग्योदयाची संधी आहे. काही राशीच्या लोकांना फायदा होईल तर काही राशींना नुकसान होईल. कोणत्या राशींवर शनीचा अशुभ प्रभाव राहील हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

वृषभ रास 
वृषभ राशीच्या लोकांना या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. हा कालावधी गुंतवणुकीसाठी अनुकूल नाही आणि एखाद्यावर जास्त विश्वास ठेवताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाच्या अभावामुळे काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते.

कन्या रास या काळात नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही त्यामुळे अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च जास्त होतील. जर तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखलात तरच तुम्हाला गोष्टी नीट समजू शकतात, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते.

वृश्चिक रास 
या काळात प्रिय व्यक्तीमुळे सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. नशिबाची साथ मिळणार नाही. शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांचे कुटुंबासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. तसेच वैवाहिक जीवनात काळजी घ्या आणि शब्द जपून वापरा.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment