तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी २०२३। शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्यांसह अन्य विकासकामे विविध निधीतून होत आहेत. त्यात काही ठराविक प्रभागांमध्येच महापालिकेचा फंडातूनच कसे काय कामे तेथे होतात, दुसर्या प्रभागांमधील कामांना का मंजुरी मिळत नाही, असे प्रश्न उपस्थित करत भाजपच्या जितेंद्र मराठे, ज्योती चव्हाण आदी सदस्यांनी आरोप करत महासभेत नाराजी व्यक्त केली.
जळगाव शहर महानगरपालिकेची महासभा बुधवारी सकाळी साडेअकराला महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेच्या विषयपत्रिकेवरील 20 प्रस्तावांवर चर्चा व निर्णय घेण्यात आले. महासभेत शहरातील रस्त्यांच्या कामांवरील प्रश्नांवर भाजप सदस्यांनी मनपा फंडातील होणार्या कामांवर प्रश्न उपस्थित करत ठराविक सदस्यांच्या प्रभागात मनपा फंडातील कामे कसे होतात असा आरोप भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी उपस्थित केला. किती मनपा फंडातून रस्त्यांची कामे झाली याची माहिती सर्व सभागृहातील सदस्यांना देण्यात यावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली. तसेच जितेंद्र मराठे यांनीदेखील हाच मुद्दा उचलत सताधार्यांना खडे बोल सुनावले.
कामावरून अभियंते गायब
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उत्तर देत रस्ते असो किंवा अन्य विकास कामांमध्ये दुजाभाव नसून, सर्व प्रभागात मनपा फंडातून कामे टाकलेली आहेत, असे सांगितले. तसेच यावेळी शहरातील तयार केलेल्या रस्त्यांवर चार महिन्यात खड्डे पडल्यांचा पाढा सर्व सदस्यांनी वाचत काम जरी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असले तरी रस्ते गुणवत्तापूर्ण होत आहे की नाही, ही मनपाची जबाबदारी आहे. आपले अभियंतेच काम सुरू असताना हजर राहत नाहीत, असे ताशेरे ओढले.
प्रभागांना 19 कोटीचा मनपा फंड
मनपा फंडातील कामांच्या बाबत अन्य सदस्यांनी आरोप केल्याने शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आमदार, खासदार यांचा निधीतून शहरात कामे होत आहे. महापौर, उपमहापौरांनी त्यांनी 19 कोटी रुपये मनपा फंडातून 19 प्रभागांना 1 कोटीप्रमाणे द्यावे, अशी मागणी केली. त्यानूसार महापौरांनी 19 कोटी रुपये मनपा फंडातून देण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, असे सांगितले.
कैलास सोनवणे-इबा पटेल यांच्यात तू-तू मै-मै
जळगाव शहरातील भंगार बाजाराच्या जागेचा प्रश्न नगरसेवक इबा पटेल यांनी मांडून ही जागा ताब्यात घेण्याची तत्परता कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच या जागेवर लॅण्ड माफियांचा डोळा असल्याचा आरोप केला. यावर भाजपचे कैलास सोनवणे यांनी प्रशासनाने नियमानुसार कारवाई करावी, असे सांगितले. यावेळी पटेल-सोनवणे यांच्यात शाब्दीक वाद झाला.
पथदिवे बंदच
शहरातील खोटे नगर ते आकाशवाणी चौकातील पथदिवे बंदच आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत अनेकांचे अपघात झाले. काहींचे जीवही गेले. तरी पण या रस्त्यावरील पथदिवे बसविले जात नाही. किती नागरिकांचे जीव घेणार, असा प्रश्न शिंदे गटाचे नगरसेवक मनोज चौधरी यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्यास काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्तेच उद्घाटन असल्याचे सांगितले.
शौचालयांचे शीट्स तोडू नका
शहरातील 26 तटावरील 661सिट्स निष्कासित करण्यासंदर्भात विषय या महासभेत होता. त्यावर वैयक्तिक शौचालय करण्यासाठी दिलेले अनुदान घेऊनही नागरिक घरी शौचालय बांधत नसल्यास कारवाई करण्याचे सांगितले. यावर 2019 पासून 8937 वैयक्तिक शौचालयांचासाठी निधी देण्यात आला असून 7557 चे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर 980 कुटुंबांनी अजूनही शौचालय बांधले नसल्याची माहिती समोर आली.
पिंप्राळातील अग्निशमन केंद्र
दुसर्या जागेवर
पिंप्राळा येथील गट क्र. 7 मधील खुला भूखंडावर अग्निशमन केंद्राच्या जागेबाबत तेथील नागरिकांचा विरोध तसेच सभेत नगरसेवक विजय पाटील, नगरसेविका शोभा बारी यांनीदेखील विरोध केला. त्यानुसार पिंप्राळ्यातील गट नं.199 मधील ओपन स्पेसवर करण्याचे ठरले.
सव्वादोन तास केवळ चर्चा…
महासभा साडेअकरा वाजता सुरू झाली, मात्र सव्वादोन तास केवळ महासभेत सदस्यांनी विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा होऊच दिली नाही. यात नगरसेवक मनोज चौधरी, नवनाथ दारकुंडे, सरिता नेरकर, सदाशिव ढेकळे, पार्वताबाई भिल, ज्योती चव्हाण आदी सदस्यांनी त्यांच्या प्रभागातील प्रश्नांचा पाढा वाचला. विषयपत्रिकेवरील विषय घेऊ द्या, असे आवाहन महापौरांनी करूनदेखील सभेत कोणीच महापौरांचे