बोदवडमध्ये चोरटे अद्यापही मोकाटच ; एकाच रात्री चार ठिकाणी चोरी, मंदिरातील दानपेट्याही फोडल्या!

---Advertisement---

 

जळगाव : बोदवड शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच घडलेल्या प्रकारात चोरट्यांनी शहरातील रेणुकामाता, मारोती आणि महादेव मंदिरातील दानपेट्या फोडून हजारोंची रोकड लंपास केली, तर तीन दिवसांपूर्वीच मुख्य बाजारपेठेतील दातांच्या दवाखान्यावरही डल्ला मारला होता.

सोमवारी पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी शहरातील ग्रामदैवत रेणुकामाता मंदिराच्या दोन दानपेट्या फोडून अंदाजे हजार रुपयांची रोकड लांबवली. परिसरातील त्याच मारोती मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे २ हजार रुपये, तसेच महादेव मंदिरातील दानपेटी फोडून आणखी काही रक्कम चोरी करण्यात आली.

या चोरीचा उलगडा श्रावण सोमवारनिमित्त सकाळी ५ वाजता पूजेसाठी आलेल्या महिलांना मंदिरात अंधार व उघडलेली दानपेटी दिसल्याने झाला. विशेष म्हणजे, या चोरट्यांचा काही दिवसांपूर्वीच दवाखाना व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्या घटनेनंतर देखील कारवाई न झाल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावले असून त्यांनी आता देवळांच्या दानपेट्याही टार्गेट केल्या आहेत.

चोरटे अद्यापही मोकाटच

पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केली नसून, चोरटे मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढत्या चोऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी व ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---