Rohit Sharma : रोहित शर्मावर मोठा आरोप; टीम इंडियाचे अभिनंदन करताना काय घडले ?

भारतीय क्रिकेट संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मावर मोठा आरोप करण्यात आला आहे. फोटोशी छेडछाड केल्याचा हा आरोप आहे. मात्र, हे आरोप कितपत खरे आहेत याची पुष्टी करू शकत नाही. पण, रोहित शर्माने फोटोशी छेडछाड केल्यामुळे सोशल मीडियावर मात्र बराच गदारोळ माजला आहे.

रोहित शर्माने केले टीम इंडियाचे अभिनंदन
टी-20 मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून अभिनंदन केले आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘ परफेक्ट स्टार्ट वेल डन टीम’असे लिहिले आहे.

 

कोणत्या फोटोवरून रोहितवर आरोप?
पण रोहितवर नेमका आरोप कशामुळे झालाय, कोणत्या फोटोमुळे गदारोळ झालाय असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. तर तो फोटो खुद्द रोहित याचाच आहे. या फोटोशी छेडछाड करून त्यात बदल करण्यात आल्याचा आरोप रोहितवर लावण्यात आला आहे. हा फोटो सध्या बराच व्हायरल झाला असून, नेमकं काय झालंय ते त्याद्वारेच स्पष्ट होतंय.

रोहितने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तो निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतोय, त्यात त्याचं पोट दिसत नाहीये. पण BCCI ने असाच फोटो शेअर केला असून त्यामध्ये तर रोहितचं पोट ( थोडं बाहेर आलेलं) दिसत आहे. त्यामुळे रोहितने स्लिम दिसण्यासाठी (त्याने शेअर केलेल्या फोटोत) बदल केला असल्याचं म्हटलं जात आहे.

रोहितच्या चाहत्यांना याची पर्वा नाही
सध्या या फोटोच्या सतत्येबाबत पुष्टी करत येत नाहीये, मात्र एक गोष्ट खरी आहे की अशा कोणत्याही फोटोंमुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना काहीच फरक पडत नाही. ‘तो आमचा चँपियन कर्णधार आहे’ असं त्याच्या चाहत्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. फिट असो किंवा नसो, तो गोलंदाजांची बरोबर धुलाई करतो ना, असेही एकाने कमेंटमध्ये नमूद केले आहे.

मात्र, आता रोहित शर्मासमोर सूर्यकुमार यादवची विजयी घोडदौड सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. श्रीलंकेत वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. आणि, यासाठी, अशा आरोपांकडे दुर्लक्ष करून, तो पूर्णपणे तयार असल्याचे दिसते.