---Advertisement---

Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

---Advertisement---

Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यात रोहित शर्माने आपल्या खेळीने विक्रमांच्या नोंदी बदलल्या. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात रोहितने नसीम शाहला टार्गेट करत उत्तुंग षटकार लगावला आणि वन डे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात जलद ९००० धावा पूर्ण करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याने २६९ वन डे सामन्यांत ४०.०१ च्या सरासरीने ११०२९ धावा केल्या आहेत, ज्यात ३२ शतकं व ५८ अर्धशतकांचा समावेश आहे.

भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात शानदार कामगिरी करत पाकिस्तानला २४१ धावांत रोखले. हार्दिक पांड्याने बाबर आझम (२३) याला बाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली.

अक्षर पटेलच्या डायरेक्ट हिटमुळे इमाम उल हक (१०) धावचीत झाला. कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतकी भागीदारी करत पाकिस्तानला सावरलं, पण १५१ धावांवर रिझवान (४६) बाद होताच त्यांचा डाव कोसळला.

सौद शकीलने ६२ धावांची खेळी करत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसा साथ मिळाला नाही. खुशदिल शाहने ३८ धावांची उपयुक्त खेळी केली. भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने ३ विकेट्स घेत ९-०-४०-३ अशी कामगिरी केली. हार्दिक पांड्याने २ विकेट्स घेतल्या.

तसेच, हर्षित राणा, अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. या सामन्यात हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० आणि कुलदीपने ३०० विकेट्सचा टप्पा गाठला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment