नागपूर, ३० एप्रिल १९८७ : भारतीय कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वांत कठीण काळातून जात आहे. मात्र, गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो मैदानावर उतरणार असून, देशातील तमाम चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
नागपूरच्या शांतीनगर भागातील बन्सोड इस्पितळात जन्मलेला रोहित आपल्या जन्मभूमीत खेळताना धावांचा पाऊस पाडेल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संघासाठीही त्याचा फॉर्ममध्ये येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अवघ्या १५ दिवसांत भारत पाकिस्तानच्या यजमानपदाखाली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा ‘मिनी वर्ल्ड कप’ म्हणून ओळखली जाते, आणि भारताने ती २०१३ नंतर जिंकलेली नाही.
हेही वाचा : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण
फॉर्ममधील लय गमावलेला रोहित
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितच्या बॅटमधून मोठ्या धावा निघालेल्या नाहीत. श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेत तो अपयशी ठरला. कसोटी क्रिकेटमध्येही त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर परिस्थिती इतकी गंभीर होती की, सिडनी कसोटीत त्याने स्वतः बाहेर बसण्याचा निर्णय घेत जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपवले. त्या मालिकेत रोहितने पाच डावांत केवळ ३१ धावा केल्या होत्या.
नागपुरात खेळताना रोहितला पुन्हा सूर सापडेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. या मैदानावर त्याने याआधी तीन वनडे सामने खेळले आहेत आणि त्यात संमिश्र कामगिरी केली आहे. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ८९ चेंडूत ७९ धावा फटकावल्या होत्या, तर २०१७ च्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते. मात्र, तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.
गुरुवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहितच्या बॅटमधून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. नागपूरच्या चाहत्यांसह संपूर्ण भारताला त्याच्या धडाकेबाज फलंदाजीची प्रतीक्षा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याचा फॉर्ममध्ये येणे भारतीय संघासाठीही मोठे दिलासादायक ठरेल.