टीम इंडियाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केलेल्या टीकेमुळे कर्णधार रोहित शर्मा नाराज झाला आहे. ही नाराजी इतकी वाढली की रोहितने थेट बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
क्रिकब्लॉगरच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर रोहितने बीसीसीआयच्या बैठकीत हा मुद्दा मांडला होता. या बैठकीत रोहितने सांगितले की, गावस्कर यांनी सार्वजनिकरीत्या कठोर शब्दांत टीका केली, ज्यामुळे खेळाडूंना मानसिक दबाव जाणवला. गावस्कर यांनी एका कॉलममध्ये रोहितच्या नेतृत्वावर तसेच खराब फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी असेही मत व्यक्त केले होते की, “पर्थमधील पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्यावर जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व करायला हवे होते.”
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
वानखेडे स्टेडियमवरील वर्धापन सोहळा आणि तक्रारीचा उलगडा जानेवारीच्या सुरुवातीला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 50व्या वर्धापन दिनाच्या समारंभात वानखेडे स्टेडियमवर रोहित आणि सुनील गावस्कर यांची भेट झाली होती. यानंतरच, रोहितने बीसीसीआयकडे तक्रार केल्याची बातमी उघड झाली आहे. गावस्कर यांच्या टीकेमुळे रोहितला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे, कारण ही टीका केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर कर्णधार म्हणूनही त्यांच्या कामगिरीवर होती.
हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!
खेळाडूंवर मानसिक दबावाचा मुद्दा रोहित शर्माला वाटते की, अशा प्रकारची कठोर टीका खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम करू शकते. त्यामुळेच त्यांनी हा मुद्दा बीसीसीआयच्या उच्चस्तरीय बैठकीत मांडला. बीसीसीआयकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सुनील गावस्कर हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्या टीकेचा खेळाडूंवर होणारा परिणाम हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक खेळाडूंच्या फॉर्मबाबत आणि संघाच्या कामगिरीबाबत केलेली टीका वादग्रस्त ठरल्याने खेळाडू आणि माजी दिग्गजांमध्ये दरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.