रोशनी शिंदे मारहाण प्रकरण, राज्य महिला आयोगाने घेतली दखल 

ठाणे : येथील ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाने ठाण्यात मोठा मोर्चा काढला. तसेच यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आता या प्रकरणाची महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. सध्या रोशनी शिंदे यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत.

काय म्हटलंय महिला आयोगाने
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे आदेश दिले आहेत. फेसबुक या समाज माध्यमावर पोस्ट केल्याचा राग धरून रोशनी शिंदे यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याची घटना वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.