Rotary Club of Jalgaon : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने गेल्या अठरा वर्षांपासून शैक्षणिक दृष्ट्या विकासासाठी दत्तक घेतलेल्या कानळद्याच्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत १६५ लिटरचे स्वयंचलित वॉटर प्युरिफायर मशीन लोकार्पण करून कायमस्वरूपी शुद्ध आणि थंड पाण्याची सुविधा निर्माण केली आहे.
रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष संतोष अग्रवाल यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अंकुर अग्रवाल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील, सरपंच पुंडलिक सपकाळे, मुख्याध्यापक राजू सोनवणे यांच्यासह अनेक माजी अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी सेंट्रलने हॅपी स्कूल करण्यासह या शाळेत संतोष अग्रवाल यांच्या नेतृत्वात सातत्याने गेली अनेक वर्षे विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्याचे व्रत स्वीकारले आहे. त्यामुळे संतोष अग्रवाल यांच्या स्मरणार्थ कानळद्याच्या या शाळेत शुद्ध व थंड पाण्याची सुविधा निर्माण करण्याचा संकल्प रोटरी सेंट्रल क्लब व सदस्यांनी पूर्णत्वास नेला असे माजी अध्यक्ष श्यामकांत वाणी यांनी बोलताना सांगितले.
क्लबचे माजी अध्यक्ष व माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी वॉटर प्युरिफायर मशीनचे लोकार्पण झाल्यानंतर आता हा प्रकल्प शाळेचा आणि गावाचा झाला आहे. त्यामुळे शाळेने याची देखभाल काळजी घ्यावी तर ग्रामस्थांनी त्याची सुरक्षेची जबाबदारी घ्यावी असे आवाहन बोलताना केले.
यांनी उचलला खारीचा वाटा
हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन महेंद्र गांधी यांच्यासह शामकांत वाणी,ओम अग्रवाल, प्राचार्य गोकुळ महाजन, श्यामलाल कुकरेजा, ॲड.रवींद्र कुलकर्णी, मिलन मेहता, ॲड.ओम त्रिवेदी,महेश राठी, यशपाल मंत्री,सुनील बाफना,अनिल वर्मा, अमित अग्रवाल, संतोष बरडे,जतिन ओझा, प्रभुदास पटेल,राजेंद्र पिंपरकर,जितेंद्र अग्रवाल, संजय तोतला, डॉ. अशोक पाध्ये, विष्णू भंगाळे, जितेंद्र बरडे, डॉ.नरेंद्र जैन, डॉ.अपर्णा भट,महेंद्र रायसोनी, कल्पेश दोशी, तृप्ती बाकरे, पंकज कासट, समर्थसिंग पाटील आणि दिनेश थोरात यांनी आर्थिक योगदान देत खारीचा वाटा उचलला आहे.