नवरात्र-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरात रूट मार्च

---Advertisement---

 

मुक्ताईनगर : नवरात्र उत्सवानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यात सार्वजनिक मंडळातर्फे 91 ठिकाणी व खाजगी 49 ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली आहे. यादरम्यान शहरात तसेच तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मुक्ताईनगर शहरातील मुख्य मार्गांवरून रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.


या रूटमार्चला शहर पोलिस स्टेशनपासून सुरुवात झाली. त्यानंतर परिवर्तन चौक, बस स्टॅन्ड, पेट्रोल पंप, तहसील रोड, आनंद ट्रेडर्स, श्रीराम नगर, नागेश्वर मंदिर, सीड फार्म, बऱ्हाणपूर रोड, परिवर्तन चौक असे मार्गक्रमण करीत परत शहर पोलिस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये दंगा नियंत्रण पथक, डीवायएसपी सुभाष ढवळे, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, पोलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक चाटे, 45पोलिस कर्मचारी, 45 होमगार्ड , जवान आदी सहभागी होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---